#ACCIDENT : अपघातात अभियंत्याचा मृत्यू
शबनम न्युज : १२ जुलै (प्रतिनिधी) मावळ :- मावळ तालुक्यातील राजपुरी येथून हिंजवडी आयटी पार्कमध्ये कामाला जाणाऱ्या अभियंत्याचा अपघातात मृत्यू झाला. जीवन शांताराम लोंढे (वय २५, रा. राजपुरी) असे त्याचे नाव आहे.
वडगाव मावळ येथील अक्षय पॅलेस हॉटेलजवळ शनिवारी (ता. ११) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारसायकल (क्र. एमएच १४, सीआर ४०९२)वरून जीवन रात्रपाळीच्या कामाला निघाला होता. त्याला टेंपोने (क्र. एमएच १४, ईएम ८६८७) धडक दिली. त्याला तातडीने उपचारासाठी सोमाटणेतील खासगी रुग्णालयात दाखल केले.

येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
