Thu. Jul 9th, 2020

मावळ मध्ये आदिम कातकरी सेवा अभियान

शबनम न्यूज : ३० जून (प्रतिनिधी )मावळ – महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील आदिवासी कातकरी समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे संबंधित योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. परिस्थितीने गरीब तसेच शिक्षणापासून दूर राहिलेला हा समाज नेहमी दुर्लक्षित राहिलेला आहे. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा त्यांना लाभ व्हावा म्हणून आवश्यक असणारे जातीचे प्रमाणपत्र त्यांना मिळावे या करिता मावळ तालुक्यात दि. १ जुलै २०२० पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

 

या मोहिमेअंतर्गत ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी यांच्या संयुक्त पाहणी अहवाल यांच्यामार्फत इतर आवश्यक कागदपत्रांचे संकलन करण्यात येणार असून या अहवालानुसार आदिम कातकरी समाजाला जातीचे दाखले व रेशनकार्ड वाटप होणार आहेत. अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली तसेच
मावळ तालुक्यातील सर्व आदिम कातकरी बांधवांना विनंती आहे की ह्या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे हि आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे .

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!