Tue. Aug 18th, 2020

संकट काळात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील – संतोष बारणे

शबनम न्यूज : पिंपरी, दि. 28 – सध्या कोरोना या जीवघेण्या रोगाच्या साथीने आपल्या सर्वांचे आयुष्य अक्षरशः विस्कळीत झाले आहे. एका बाजूला या रोगाची लागण होण्याची भीती असतानाच दुसरीकडे अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत, त्यामुळे सध्या अनेक लोक आयुष्य कसे जगावे या कात्रीत सापडले आहेत.अशा अडचणीत आलेल्या युवकांसाठी रोजगार संधी उपलब्ध व्हावी या करीता माजी विरोधी पक्ष नेते संतोष बारणे व नगर सेविका मायाताई बारणे हे अनेक प्रयत्न करीत आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विरोधी पक्ष नेते संतोष बारणे, नगर सेविका सौ. मायाताई बारणे, युवा नेते . गणेश गुजर , युवा नेते .जयदिप माने यांनी पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रातील तसेच इतर सर्व क्षेत्रातील रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तिंशी आणि संस्थांशी चर्चा केली. या चर्चेतून असे आढळून आले कि सध्या आपल्या परिसरात जवळपास ७ ते ८ हजार पर्यंत मनुष्यबळाची गरज आहे. ( मॕकनिकल, इलेक्ट्रिकल, वेल्डर, टर्नर, आयटीआय. १०/१२वी पास सिक्युरिटी, हाऊसकिपींग) कोरोनाच्या दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने,सध्या विविध क्षेत्रात बेरोजगार साठी रोजगाराची नवी दारे उघडली गेली आहेत. या करीता आवाहन करण्यात आले आहे कि सर्व इच्छुक तरुणांनी त्यांचा बायोडाटा दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवावा. त्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व बायोडाटांचे वर्गीकरण करून आवश्यकतेनुसार त्या त्या क्षेत्रातील कंपन्यांकडून अथवा संस्थांकडून मुलाखती ची व्यवस्था केली जाईल व त्यानंतर निवडप्रक्रिया होईल.
बायोडाटा पाठविण्यासाठी ईमेल आयडी – [email protected]
[email protected]

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड येथे ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता हजर राहण्याचे आवाहन

पुणे विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे

शहरातील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा – महापौर उषा उर्फ माई ढोरे

पुणे श्रमिक पत्रकार संघाचा वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपन्न

नेहरूनगर येथील आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस

बालनगरी येथील कोविड केअर सेंटर चे काम रद्द

ताज्या बातम्या

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड येथे ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता हजर राहण्याचे आवाहन

पुणे विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे

शहरातील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा – महापौर उषा उर्फ माई ढोरे

पुणे श्रमिक पत्रकार संघाचा वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपन्न

नेहरूनगर येथील आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस

error: Content is protected !!