Sat. Jul 4th, 2020

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची उद्योजकांशी चर्चा सफल

शबनम न्यूज २० मे ( पुणे ) – मिनरल वॉटर निर्मिती,बाटलीबंद पाण्याची निर्मिती उद्योगाचा आवश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला असून लॉक डाऊन मुळे अडचणीत आलेल्या या उद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारकडून कर्ज,इतर भार न लावता प्रत्यक्ष दरातील वीज आणि सवलतींची घोषणा करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ने राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सदस्यांचा झूम एप द्वारे संवाद घडवून आणला .

ही चर्चा आज मंगळवार दि १९ मे रोजी सकाळी ११ वाजता झाली. महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी या चर्चेबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली.

‘बाटलीबंद पाणी निर्मितीचे राज्यात हजारो उद्योग आहेत. कोरोना विषाणू साथीच्या लॉक डाऊन काळात हे उद्योग बंद पडलेले होते. लॉक डाऊन -४ मध्ये या उद्योगांना पूर्ववत निर्मितीची परवानगी मिळाल्यावर या उद्योजकांनी आपल्या अडचणी मांडण्यासाठी झूम एप द्वारे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा आयोजित केली आणि ती सफल झाली. असोसिएशन चे २७० सदस्य या चर्चेत सहभागी झाले.

मिनरल वॉटर निर्मिती उद्योगाचा आवश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला असून लॉक डाऊन मुळे अडचणीत आलेल्या या उद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारकडून विनातारण कर्ज देण्याची व्यवस्था केली जाईल .इतर भार न आकारता प्रत्यक्ष दरात वीज आणि इतर सवलतीं दिल्या जातील. या उद्योगांना बी आय एस प्रमाणपत्रासाठी दर वर्षी भरावी लागणारे सुमारे १.२५ लाख रुपये शुल्कही कमी व्हावे ,यासाठी केंद्राकडे आपण प्रयत्न करू,असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

परवाना नसताना बाटलीबंद पाण्याची निर्मिती करणे गुन्हा असून शेकडो उद्योग बेकायदेशीर पणे निर्मिती करीत असल्याचे असोसिएशनने मंत्र्यांच्या निदर्शनास आणले . या विना परवाना उद्योगांवर कारवाई केली जाईल,असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी आमची चर्चा सफल यशस्वी झाली असून या सवलती मिळण्यासाठी आम्ही सरकारशी पाठपुरावा करीत राहू,असे विजयसिंह डुबल यांनी सांगितले.

 

VIDEO : पिंपरी चिंचवड शहरात दोन दिवस होणार कडक लॉक डाऊन;आज 232 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ

PUNE : ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट’वर वेबिनार द्वारे मार्गदर्शन

दिलासादायक : पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या कोरोना रुग्णांचे प्रमाण 60.66 टक्के

पंढरपूर : या वर्षीच्या वृक्ष लागवडीचा शुभारंभ पंढरपूर येथून….

कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

ऑनलाईन शिक्षणाच्या फी बाबत सक्ती नको – विलास पाटील

ताज्या बातम्या

VIDEO : पिंपरी चिंचवड शहरात दोन दिवस होणार कडक लॉक डाऊन;आज 232 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ

PUNE : ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट’वर वेबिनार द्वारे मार्गदर्शन

दिलासादायक : पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या कोरोना रुग्णांचे प्रमाण 60.66 टक्के

पंढरपूर : या वर्षीच्या वृक्ष लागवडीचा शुभारंभ पंढरपूर येथून….

कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

error: Content is protected !!