पिंपरी चिंचवड शहरात रुग्ण वाढत , सात जणांना कोरोनाची लागण
शबनम न्यूज ६ मे (पिंपरी चिंचवड ) – पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. आज बुधवारी सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ६ पुरुष व एका २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर पुण्यातील एका २८ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण मोशी, पिंपळे गुरव, चिंचवड येथील रहिवासी असून ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. पुरुषांची वये अनुक्रमे २१, २३, २४, २५, २८, ५० अशी आहे. त्यामुळे सकारात्मक रुग्णांची संख्या १४२ वर पोहोचली आहे.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिलेचा कोरोनामुळे आज मृत्यू झालेला आहे. ही महिला शिवाजीनगर येथील रहिवासी होती.