Wed. May 27th, 2020

#CORONAVIRUS : पुण्यात ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शबनम न्यूज : पुणे (दि.30 मार्च) – करोनाने राज्यात थैमान घातलं असून सर्वात जास्त प्रभाव मुंबई आणि पुण्यात पहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यात करोनाचा पहिला बळी गेला असून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे राज्यातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. यासोबत देशात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

 

 

 

 

पुण्यात एकूण ३१ लोक करोनाने बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी सात जणांवर यशस्वी उपचार करुन घरी पाठवण्यात आलं आहे. मात्र आज या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांना २१ तारखेला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तपासणी केले असता करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यांना उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचं उपचारादरम्या निधन झालं.

 

ताज्या बातम्या