Thu. Apr 9th, 2020

pimpri : नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे यांच्या माध्यमातून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक औषध फवारणी

शबनम न्युज : पिंपरी (दि. २६ मार्च ) –पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 21 मध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली.नव महाराष्ट्र विद्यालय परिसर बालामन चाळ-भैरवनाथ नगर-भिमनगर-न्हावे आळी-वाघेरे काॅलनी १,२,३,४,गिता निवास परिसर,संपूर्ण पिंपरी वाघेरे गावठाण,पुणे जिल्हा बॅंक परिसर, वैभव नगर,संत केवराम पार्क परिसर,कुदळे-पडाळ चाळ १,२,३,४,५, तपोवन मंदिर रोड,माळी आळी, कापसे आळी, अशोक थिएटर परिसर,संजय गांधीनगर, गणेश नगर,पिंपरी कॅम्प परिसर, शिवदत्त नगर, कैलास नगर, शास्त्री नगर, बलदेव नगर या सर्व ठिकाणी ऋषिकेश संजोग वाघेरे पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन औषध फवारणी केली.

 

 

 

 

सध्या जगात कोरणा विषाणूचा थैमान सुरू आहे पिंपरी-चिंचवड शहरातील या कोरोना विषाणूमुळे अनेक संकटाचा सामना नागरिक व प्रशासन करीत आहेत ,सध्या देशभरात 21 दिवसांचा लॉक डाऊन सुरू आहे नागरिक घराबाहेर पडण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहे .अशा वेळेस नागरिकांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही याची सर्वस्वी काळजी नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे यांच्या माध्यमातून व प्रयत्नातून घेतली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 21 मध्ये विषाणू प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करण्यात आली.तसेच नागरिकांनी घरातच राहावे व सुरक्षित राहावे असे आवाहन उषाताई वाघेरे यांनी केले आहे

 

ताज्या बातम्या