Mon. Mar 30th, 2020

CORONAVIRUS : जगभरात 4,22,829 जणांना कोरोनाची लागण

शबनम न्यूज : दिल्ली (दि. २५ मार्च ) – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसने अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. असे असताना चीन, इटलीसह भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरात 4,22,829 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील विशेष बाब म्हणजे 1,09,102 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.

 

 

 

 

 

 

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इटली, अमेरिकेसह भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. भारतात आत्तापर्यंत 5५० हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध सरकारे उपाययोजना करत आहेत.

 

ताज्या बातम्या