Mon. Mar 30th, 2020

येणारे काही दिवस गडद संकटाचे असल्याने नागरिकांनी घरीच थांबावे – खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

शबनम न्यूज : नांदेड (दि. २५ मार्च ) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषीत करुन जमावबंदीचे आदेश दिले आहेत. देशासह राज्यात फैलावणारा कोरोना आपल्याला परतवायचा असून नागरिकांनी घरीच थांबावे, अशी कळकळीची विनंती नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

 

 

 

 

 

 

कोरोना विषाणूजन्य आजारामुळे जग, देश राज्यावर मोठे संकट आले आहे. देश व राज्यावरील कोरोनाचे संकट टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी रविवारी पुकारलेल्या जनता कर्म्युला अभुतपूर्व प्रतिसाद दिला. येणारे काही दिवस गडद संकटाचे असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. अत्यंत महत्वाचे जसे दवाखाना किंवा जिवानावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडावे, वेळोवेळी हाथ धुवावे, प्रशासनाकडून देण्यात येणा-या सूचनांचे पालन करावे व घरीच थांबून कोरोनाला पळवावे, अशी विनंती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

 

ताज्या बातम्या