Sun. Aug 9th, 2020

जेवणावरून झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू

शबनम न्युज : – दि.१२  पंढरपूर : तालुक्यातील पळशी येथे ‘घरी जेवायला का आला नाही’ या कारणावरून वाघमारे आणि मोरे कुंटुबीयात भांडण झाले. या भांडणामधे सोमनाथ मोरे हा मृत्युमुखी पडला आहे. याबबात दत्तात्रय मोरे यांच्या फिर्यादीवरून  पाचजणांविरुध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामधील तीनजणांना  अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिली आहे.

तालुक्यातील पळशी या गावामधे सोमवारी रात्री दिगंबर वाघमारे हे वसंत मोरे यांच्या वस्तीजवळ गेले. मोरे यांच्याच घरासमोर उभे राहून वाघमारे यांनी ‘आमच्या घरी जेवायला का आला नाही’ या कारणावरून मोरे यांना शिवीगाळ सुरू केली. मोठा आरडाओरडा देखील केला. यावेळी मोरे यांचे बंधू तसेच त्यांचे पुतणे, चुलत्या हे बाहेर आल्या. यावेळीच दिगंबर वाघमारे यांनी आपले बंधू हरिदास वाघमारे, नारायण वाघमारे, श्रीधर वाघमारे आणि सचिन वाघमारे यांना बोलावून घेतले. यात बाचाबाची झाली. यावेळी नारायण वाघमारे यांने वसंत आणि दत्तात्रय यांना मारहाण केली.

तसेच ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या महिलांनादेखील मारहाण करण्यात आली. या वेळी सोमनाथ मोरे हे ‘महिलांवर हात कशाला उगारता ’ असे म्हणत या भांडणात आले. त्यावेळी दिगंबर वाघमारे यांनी सोमनाथ यांचा गळा दाबून त्यांना भिंतीकडे ढकले. यामधे सोमनाथ हे बेशुध्द झाले.    यानंतर सोमनाथ यांना भाळवणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले. भाळवणीतून पंढरपूरकडे उपजिल्हा रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच सोमनाथ मोरे हे मृत पावले होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

सातारा व कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

error: Content is protected !!