Tue. May 26th, 2020

झोपडपट्टीसुरक्षा दलाच्यावतीने महात्मा फुले पगडी , उपरणे व पुष्पगुछ देऊन सन्मानित

शबनम न्यूज : पुणे (दि. ०४) – भोर वेल्हा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संग्राम थोपटे हे भरघोस मताने निवडून आल्याबद्दल झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने बंडगार्डन रोडवरील इन्स्पेक्शन बंगलो येथे नवनिर्वाचित आमदार संग्राम थोपटे यांचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्याहस्ते महात्मा फुले पगडी उपरणे व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले .

यावेळी सुरेखा भालेराव वामन कदम संतोष कदम सतीश कांबळे सूर्यकांत संकपाळ अरुणा लांडगे सुरेखा भोसले अर्चना वाघमारे वंदना पवार दिना शेखर गोरोबा पारधे सोनिया जाधव वैशाली अवघडे दत्ता कांबळे गणेश लांडगे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी भोर वेल्हा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संग्राम थोपटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले कि आपल्या मतदार संघातील कातकरी व आदिवासी बांधवाचे  झोपडपट्टी वासियांचे आपण लवकरात लवकर पुनर्वसन करणार असून त्यासाठी गायरान जमिनी मिळविण्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांची बैठक बोलविणार आहोत . तसेच तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देणार . सिंचनाचे रखडलेले प्रकल्प लवकरच मार्गी लावणार आहोत . गडकिल्ल्यांचा विकास साधून पर्यटनासाठी पर्यटकांना सुखसुविधा उपलब्ध करून देणार . गुंजवणीचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देणार तसेच वांगली वाल्हे व शिवगंगा खोऱ्यातील पाणी लिफ्ट पद्धतीने आपण देणार आहोत . पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाची  विकासाची कामे   आपण लवकरच मार्गी लावणार आहोत . चांदणी चौक ते भांडगाव रोडचे काम जलदगतीने करणार असून पिरंगुट येथे एम आय डी सी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे . हिंजवडीमधील रस्त्याची कामे करणार आहोत .

यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी झोपडपट्टी वासियांचे प्रश्न मांडले . त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी आपल्या भाषणात मांडल्या . 

 

ताज्या बातम्या