Sun. Aug 9th, 2020

अणुस्फोट चाचणीची पायाभरणी इंदिरा गांधी यांच्यामुळे, सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले नौदलाचे आधुनिकीकरण – सचिन साठे

शबनम न्यूज : पिंपरी (दि. ३१) – दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी 1967 ते 1977 या काळात अणु ऊर्जा मंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता. त्या काळात त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळेच भारताची अणु ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली. अणुस्फोट चाचणीची पायाभरणी इंदिरा गांधी यांनी केली. देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी नौदलाच्या आधुनिकीरणाच्या योजना अंमलात आणून देशाचा समुद्र किनारा संरक्षित केला. असे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त व देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त निगडी प्राधिकरण येथे शहर कॉंग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग कार्याध्यक्ष गौतम आरकडे, माजी महापौर कवीचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कार, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, ज्येष्ठ नागरीक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, असंघटीत कामगार कॉंग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे, मूनसुफ खान, विशाल कसबे, मेहताब इनामदार, ,शशिकांत कांबळे, सुनील राऊत, हिरामण खवळे, आशा शहाणे, नितीन पाटेकर, सचिन नेटके, विष्णू खरे, पांडुरंग जगताप, संदेश नवले, आबा खराडे, बेंजामीन डिसुझा, अर्जुन खंडाळे, भास्कर नारखेडे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, इंदिरा गांधी आपल्या जीवनात अनेक क्षेत्रात लौकिक प्राप्त केला. त्यांना 1972 मध्ये भारतरत्न पुरस्कार, 1972 मध्ये बांगलादेश मुक्तीकरिता मेक्सिकन अकादमी पुरस्कार, 1973 मध्ये एफएओचे दुसरे वार्षिक पदक व 1976 मध्ये नागरी प्रचारिणी सभेकडून साहित्य वाचस्पती (हिंदी) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 1953 साली श्रीमती इंदिरा गांधीं यांना अमेरिकेच्या ‘मदर’ पुरस्काराने, मुसद्देगिरीतील उत्कृष्ट कार्याबद्दल इटलीने ‘इसाबेला डी’इस्टे’ पुरस्कार व येल विद्यापीठाने हाउलंड मेमोरियल पुरस्कार देऊन गौरविले होते. फ्रान्स जनमत संस्थेच्या सर्वेक्षणानुसार त्या 1967 व 1968 मध्ये फ्रान्सच्या सर्वात लोकप्रिय महिला होत्या. 1971 मध्ये अमेरिकेच्या विशेष जनमत सर्वेक्षणानुसार त्या जगातील सर्वात लोकप्रिय महिला होत्या. प्राण्यांच्या संरक्षणासाठी 1971 मध्ये अर्जेंटिना सोसायटीकडून त्यांना मानद उपाधी देण्यात आली होती. अशा विविध आंतरराष्ट्रीय स्थरावरील पुरस्कारांने त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुत्सद्दीपणामुळे संस्थानांचे विलीनीकरण करण्यात आले. भारतावर स्वातंत्र्यापुर्वी समुद्रामार्गेच आक्रमणे झाली होती. हा इतिहास लक्षात घेवून सरदार पटेल यांनी केंद्रिय मंत्री मंडळाच्या संरक्षण समितीच्या पहिल्याच बैठकीत नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी दहा वर्षांची योजना सादर केली. तसेच भारताचा विस्तिर्ण समुद्र किनारा संरक्षित करण्यासाठी नौदलाचे आधुनिकीकरण करण्याच्या योजना अंमलात आणल्या. असे हि साठे यांनी सांगितले.
स्वागत मयुर जयस्वाल, आभार विशाल कसबे यांनी मानले.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

सातारा व कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

error: Content is protected !!