WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

सातारा येथे महामार्ग ओलांडणार्‍या खाणकामगाराचा कारने उडवल्याने मृत्यू

SHABNAM NEWS : SATARA (DATE. 21) – पुणे-बंगळूर महामार्गावर नागेवाडी, ता. सातारा येथे महामार्ग ओलांडणार्‍या खाणकामगाराचा कारने उडवल्याने मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक पळून जात असताना ग्रामस्थांनी त्याला जेरबंद केले.

 

 

लिंबखिंडीतील खाणकामगार संजय हणमंत कुटकर (वय 45, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. रामनगर) हे कामावरून घरी जाताना नागेवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ महामार्ग ओलांडत होते.

यावेळी सातारावरून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या कारने (एमएच-03 – सीएच 4083 ) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या संजय कुटकर यांना सातारा सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो. ह. संदीप पाटील करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

ताज्या बातम्या