WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका

शबनम न्यूज : – अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. अकोल्यातील ओझोन हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे.  त्यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी देखीत करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टर हिंगणकर यांनी दिली आहे.

सध्या राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पण भाजपने तिकीट कापल्याच्या तणावातून संजय धोत्रे यांनी हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे तिकिटासाठी अंतर्गत संघर्ष सुरू आहे.

 

– भापचे अकोल्याचे विद्यमान खासदार

– सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत

– तीनही वेळा भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला आहे

– 1999 मध्ये विधानसभा निवडणुकीपासून राजकीय कारर्कीद सुरू

– 1999मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत विजय

– 2004, 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत विजय

– 31 ऑगस्ट 2009 पासून ग्रामीण विकास समितीचे सदस्य म्हणून कार्यरत

सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपनं मात्र अद्याप देखील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही. त्यामुळे भाजपची यादी केव्हा येणार? कुणाला संधी मिळणार? कुणाचा पत्ता कट होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण, ही उत्सुकता लवकरच संपणार असून भाजप आज पहिली यादी जाहीर करणार आहे. पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी भाजपनं देखील जोरदार तयारी केली आहे. उमेदवारांची निवड करताना भाजप मोठे निर्णय घेऊन काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे. खासदारांच्या पाच वर्षाच्या कामगिरीचा आढावा, जनमताचा विचार करता हा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपनं काही सर्व्हे देखील केले आहेत. तिकीट वाटपामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील जातीनं लक्ष घातलं आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूकदेखील वाढली आहे.

भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आता काँग्रेसनं देखील विरोधकांची मोट बांधली आहे. समविचारी पक्षांना एकत्र घेत शक्य त्या ठिकाणी आघाडी करण्यात आली आहे. काही सर्व्हेनुसार NDAला 2014च्या तुलनेत कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. पण, NDA सत्तेत मात्र कायम असणार आहे. शिवाय,2014चा विचार करता युपीएच्या जागांमध्ये  2019मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहे. सर्वच पक्षांनी आता प्रचाराला सुरूवात केली असून निवडणूक आयोगानं देखील काही नियम जारी केली आहे. शिवाय, सोशल मीडियावर देखील आता निवडणूक आयोगाचं लक्ष असणार आहे.

 

 

ताज्या बातम्या