सावित्रीबाई जयंतीनिमित्त महीला शिक्षण दिन साजरा

0
103
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / पुणे

सुनीता फाउंडेशन व झुंज दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी सुनिता फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल मोरे तसेच झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे , नूतन रोहमारे , गणेश रोहमारे तानाजी मराठे ,दिनेश फाटक, बाबासाहेब मुळे, सिद्धेश्वर सोनवणे ,दिलीप काळे, सारिका राजपूत ,हे मान्यवर उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचा व स्त्रियांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयन बाळसराफ व कार्यक्रमाचे आभार शारदा गांगुर्डे यांनी केले.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous article#PIMPRI : मनपा वतीने भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
Next articleराजकीय सोयीसाठी घरकुलची घोषणा नको , सर्व बेघराना घरकुल मिळावे : बाबा कांबळे