Sat. Oct 3rd, 2020

196 अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर करण्यात येणार

शबनम न्युज : २४ सप्टेंबर (प्रतिनिधी) पुणे :-  जे अभ्यासक्रम तीन पेक्षा कमी महाविद्यालयांमध्ये चालविले जातात, अशा 196 अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे संपूर्ण नियोजन महाविद्यालय स्तरावर करण्यात येणार आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने बुधवारी आदेश काढले आहेत.

पुणे विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन सुरू केले आहे. सध्या प्रत्येक विषयांचे बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) काढण्याचे काम सुरू आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निवडीसाठी तांत्रिक समितीच्या बैठका सुरू आहेत.

पुणे विद्यापीठात किंवा महाविद्यालय स्तरावर दरवर्षी नव्याने अभ्यासक्रम सुरू केले जातात. हे अभ्यासक्रम तीन किंवा तीन पेक्षा कमी महाविद्यालयात सुरू असतील तर त्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासाठी 2011-12 मध्येच निर्णय घेतला आहे. मात्र, यंदाच्या परीक्षेसाठी त्याबाबत परिपत्रकात स्पष्टता नव्हती, त्यामुळे परीक्षा मंडळाने आज परिपत्रक काढून संबंधित महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार 196 अभ्यासक्रम हे तीन पेक्षा कमी महाविद्यालयात शिकवले जात आहेत. त्यासाठी या अभ्यासक्रमांच्या प्रश्‍नपत्रिका तयार करणे, वेळापत्रक निश्‍चित करून ते पाच ऑक्‍टोबर पर्यंत सादर करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत.

शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा,  (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.

#MAVAL : आढले खुर्द १२८६ नागरिकांची आरोग्य तपासणी ; एक ही पाँझिटिव्ह रुग्ण नाही

#PIMPRI : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संपूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत – खासदार डॉ. अमोल कोल्हे

#PUNE : महावीर जोंधळे लिखित महात्मा गांधींवरील मराठीतील पहिल्या दीर्घ कवितेचे प्रकाशन

#PIMPRI : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभाग क्रमांक 30 दापोडीमध्ये संपन्न

#PIMPRI : ‘यशस्वी’ संस्थेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

ताज्या बातम्या

#MAVAL : आढले खुर्द १२८६ नागरिकांची आरोग्य तपासणी ; एक ही पाँझिटिव्ह रुग्ण नाही

#PIMPRI : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संपूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत – खासदार डॉ. अमोल कोल्हे

#PUNE : महावीर जोंधळे लिखित महात्मा गांधींवरील मराठीतील पहिल्या दीर्घ कवितेचे प्रकाशन

#PIMPRI : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभाग क्रमांक 30 दापोडीमध्ये संपन्न

#PIMPRI : ‘यशस्वी’ संस्थेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

error: Content is protected !!