Tue. Sep 8th, 2020

#PIMPRI : वाकड मधील द्रोपदा लॉन्स क्वारंटाईन सेंटरसाठी मोफत देणार – विशाल वाकडकर

शबनम न्युज : १८ जुलै (प्रतिनिधी ) पिंपरी :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील कोविड – 19 ची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन वाकड संत तुकाराम चौकातील द्रोपदा लॉन्स हे मंगल कार्यालय मोफत महानगरपालिकेला क्वारंटाईन सेंटर उभारण्यासाठी देत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

 

 

 

 

 

 

वाकड येथे डांगे चौक – हिंजवडी रोडवर विशाल वाकडकर यांच्या मालकीचे द्रोपदा लॉन्स हे मंगल कार्यालय आहे. यामध्ये सर्व सोईयुक्त दहा – दहा हजार स्वेअर फुटांचे दोन शेड आणि पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी आवश्यक त्या कालावधी पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांच्या सोईसाठी क्वारंटाईन सेंटर उभारावे असे पत्र वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शनिवारी (दि. 18) ई मेल व्दारे दिले.

जुलै महिना अखेरपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात कोविड -19 च्या रुग्णांची संख्या 25 हजारांपर्यंत होऊ शकते अशी शक्यता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली आहे. सद्यपरिस्थितीत वाकड परिसरातील कोविड – 19 च्या बहुतांशी रुग्णांना बेड उपलब्ध नसल्यामुळे गैरसोय होत आहे. या भागातील नागरिकांची अडचण व गरज विचारात घेऊन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशाल वाकडकर यांनी स्वत:च्या मालकीचे द्रोपदा लॉन्स मधील दोन शेड महानगरपालिकेला क्वारंटाईन सेंटरसाठी मोफत देण्याची इच्छा व्यक्त केली. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर हे वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेले संवेदनशील युवा नेतृत्व आहे. त्यांनी ऊक्ती प्रमाणे कृती केली आहे. असेच समाज उपयोगी उपक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले.

याबाबत पुढील कार्यवाही मनपा प्रशासनाने ताबडतोब करावी व कोविड -19 च्या रुग्णांना सेवा सुविधा उपलब्ध करुन द्यावी. अशीही माहिती वाकडकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच शहरातील इतर समाजसेवी संस्थांनी, मंगल कार्यालयाचे मालकांनी, गोडाऊन व वेअर हाऊस च्या मालकांनी आणि ज्यांच्याकडे क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यायोग्य जागा, शेड उपलब्ध असेल अशा नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे. असे आवाहन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले आहे.

कोरोना कोविड-19 या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी शहरामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालय या ठिकाणी उपचार व क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहेत. आजपर्यंत शहरात एकूण 13 ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहेत. तरी देखील उपलब्ध खाटांची संख्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी आहे. त्यामुळे गंभीर लक्षणे असणा-या अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. अनेक रुग्णांना होम क्वारंटाईन करावे लागत आहे. आगामी काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. हे विचारात घेता शहरात प्रभाग निहाय क्वारंटाईन सेंटर उभारावेत. यासाठी प्रत्येक प्रभागातील आवश्यकतेनुसार मनपाच्या व खासगी शाळा, महाविद्यालये त्यांची वसतिगृहे, सार्वजनिक सभागृहे, समाज मंदिरे आणि मंगल कार्यालये, खासगी कंपन्यांचे गोडाऊन, वेअर हाऊस ताब्यात घ्यावेत व तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावेत. अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे शुक्रवारी केली होती.

 

 शबनम न्यूज आता टेलीग्राम वर उपलब्ध आमचं चैनल जॉईन करण्यासाठी (@Shabnamnews)
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
  शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.
 

पुणे ते लोणावळा लोकल ट्रेन सुरू करा; मानव आधार सामाजिक संघटनेची मागणी

औद्योगिक नगरीतील शासकीय आयटीआय राज्यात मॉडेल करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार  – आमदार आण्णा बनसोडे

कला विषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

‘संस्कृत भाषा गंगेप्रमाणे निरंतर आहे’ : राज्यपाल

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा-डी.एन.ए. विभाग अधिक सक्षम करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

किसान रेल्वेला लासलगांवला थांबा देण्याची मंत्री छगन भुजबळ यांची रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी

ताज्या बातम्या

पुणे ते लोणावळा लोकल ट्रेन सुरू करा; मानव आधार सामाजिक संघटनेची मागणी

औद्योगिक नगरीतील शासकीय आयटीआय राज्यात मॉडेल करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार  – आमदार आण्णा बनसोडे

कला विषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

‘संस्कृत भाषा गंगेप्रमाणे निरंतर आहे’ : राज्यपाल

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा-डी.एन.ए. विभाग अधिक सक्षम करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

error: Content is protected !!