Thu. Jul 9th, 2020

पुणे विभागातील 16 हजार 372 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

शबनम न्यूज : ३० जून (प्रतिनिधी )पुणे – पुणे विभागातील 16 हजार 372 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 26 हजार 974 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 9 हजार 531 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 588 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.70 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.97 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

 

 

 

 

 

यापैकी पुणे जिल्हयातील 22 हजार 135 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 13 हजार 98 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 295 आहे. कोरोनाबाधित एकूण 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 414 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.17 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.35 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 25 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 898, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 79, सांगली जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर जिल्ह्यात 8 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 31 रुग्ण असून 720 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 268 आहे. कोरोनाबाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 2 हजार 609 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 733 आहे. कोरोना बाधित एकूण 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 360 रुग्ण असून 226 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 122 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 839 कोरोना बाधीत रुग्ण असून 716 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 113 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 74 हजार 95 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 71 हजार 155 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 940 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 43 हजार 853 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 26 हजार 974 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!