PIMPRI : उपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; नगरसेवक तुषार हिंगे
लॉकडाऊनमध्ये गरजूंना औषधे, सुरक्षा किट, धान्य, भाजीपाला, भोजनाचे वितरण, तर पोलिसांना राहण्यासाठी हॉटेल व्यवस्था
पहिल्या दिवसांपासून तुषार हिंगे प्रभागात ठाण मांडून
शबनम न्यूज : पिंपरी, दि. 28 – कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार वाढू नये म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. त्या काळात सर्वसामान्य, कष्टकरी, दिव्यांग, निराधार, गरजू लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपमहापौर तुषार हिंगे पहिल्या दिवसांपासून कार्यरत आहेत. शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी प्रभाग क्रमांक दहामधील गरजू नागरिकांना धान्य, भाजीपाला, भोजन तसेच, औषध वितरणासह औषध फवारणी, सॅनिटायझर टनेल उभारणी, तात्पुरता भाजीपाला विक्री केंद्र, मास्क व सॅनिटायझर वितरीत करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या सक्रिय पुढाकाराबद्दल प्रभागातील नागरिक कौतुक करीत आहेत.
चिंचवड स्टेशन येथील पोलिस लाइन वसाहत येथील 100 कुटुंबांना 15 दिवसांचा भाजीपाला त्यांनी वितरीत केला. निगडी व पिंपरी पोलिस ठाण्यात सॅनिटायझर टनेल बसविण्यात आल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी स्वत:ला निर्जंतूक करून कामकाज करीत आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्वखर्चाने औषध फवारणी केली. उपमहापौर तुषार हिंगे व कार्यकर्त्यांनी स्वत: फवारणी केली. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडूनही औषध फवारणी करून घेतली.
प्रभागातील 100 गरजू कुटुंबाना किराणा व अत्यावश्यक साहित्याचे किट देण्यात आले. ‘विटॉमीन सी’ या कॅल्शियम वाढीच्या होमिओपॅथी औषधाचे प्रभागातील तब्बल 7 हजार 500 कुटुंबांना मोफत वितरण करण्यात आले. प्रभागातील गरजू, कष्टकरी, दिव्यांग, ज्येष्ठ आणि निराधार असा एकूण 2 हजार लोकांना दररोज भोजन वितरण सुरू आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हा उपक्रम सुरू आहे. प्रभागातील 9 झोपडपट्यांतील अनेक रहिवाशांना रेशनकार्डवर धान्य मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. त्याबाबत तहसीलदार व अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेऊन सर्वसामान्यांना रेशन दुकानातून योग्य प्रमाणात धान्य मिळवून दिले. तसेच, शाहूनगर व मोरवाडीत तात्पुरती भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्या ठिकाणी सॅनिटायझर टनेल उपलब्ध करून दिले.
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी दत्तनर, विद्यानगर, शंकरनगर, लाल टोपीनगर या झोपडपट्टयात मंडप घालून मुख्य रस्ते सील करण्यात आले. उपमहापौर हिंगे यांनी स्वत:चे थरमॅक्स चौक, चिंचवड येथील पंजाब रसोई हॉटेल पोलिसांना विश्रांतीसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्याचा लाभ असंख्य पोलिस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.
आजारी असतानाही तुषार हिंगे हे प्रभागात पहिल्या दिवसांपासून फिरत आहेत. गरजू व सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय करीत आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेगवेगळ्या बैठकांना उपस्थित राहून संबंधित अधिकार्यांना मार्गदर्शन करीत आहेत. महापालिका प्रशासनाच्या सुचनांची प्रभागात तातडीने अंमलबजावणी करून घेत आहेत.
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसांपासून प्रभागात कार्यरत असलेले तुषार हिंगे अद्यापही नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. स्वत: उपमहापौर हिंगे आणि त्यांच्या आरंभ सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व शेकडो कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.