कोरोना मुक्त थेरगाव मोहीम अंतर्गत डॉक्टर आपल्या दारी उपक्रमास मोठा प्रतिसाद – संतोष बारणे
शबनम न्यूज ८ मे ( पिंपरी चिंचवड ):- सध्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव थांबविण्या साठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्यास अनुसरून थेरगाव परिसरातील माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे व विद्यमान नगरसेविका माया ताई संतोष बारणे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील सर्व नागरिकांसाठी डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला थेरगाव मध्ये जवळपास 9 215 नागरिकांची तपासणी करण्यात आली तसेच लॉक डाऊन शिथिल झाल्याने परराज्यातील नागरिक, मजूर बांधव यांना पोलीस परवाना साठी आवश्यक असणारे फिटनेस सर्टिफिकेट डॉक्टर मानसिंग वाळुंज यांचे सहकार्याने देण्यात येत आहे. त्याकरिता गरजू नागरिकांनी संतोष मंगल कार्यालय थेरगाव येथे 7 मे ते 10 मे दरम्यान संपर्क साधण्याचे आवाहन माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे व नगरसेविका मायाताई संतोष बारणे तसेच गणेश गुजर व जयदीप संपत माने यांनी केले आहे.