स्त्री शक्ती जागरण मंच वतीने पोलीस बांधव व भाजीपाला विक्रेते यांना मास्क वाटप
स्त्री शक्ती जागरण मंच वतीने पोलीस बांधव व भाजीपाला विक्रेते यांना मास्क वाटप
शबनम न्यूज ७ मे (पिंपरी चिंचवड ) – सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे या कोरोणा विषाणूच्या विरोधी युद्धात पोलीस प्रशासन आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडीत आहे या लॉक डाऊन काळामध्ये जीवनावश्यक वस्तू ची दुकाने सुरुवातीपासूनच सुरू ठेवण्यात आली आहे यामध्ये किराणा, भाजीपाला विक्रेते ही दुकाने सुरू आहेत तसेच या संकटमय काळामध्ये पोलीस प्रशासन अविरतपणे कार्यरत आहे सोशल डिस्टन्स ठेवून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री होत आहे.
असे असताना भाजीपाला विक्रेते असो किंवा पोलीस प्रशासन यांना आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो याकरिता महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली संघटना स्त्री शक्ती जागरण मंच वतीने संस्थापक अध्यक्ष सुनिता ताई अशोक अडसुळे व त्यांच्या परिवार वतीने अविरतपणे कार्य करत असलेल्या व आपली जबाबदारी योग्य रितीने पार पडत असलेले पोलीस कर्मचारी यांना मास्क व सैनीटायझर चे वाटप करण्यात आले तसेच जे भाजीपाला विक्रेते या संकट समयी काळामध्ये भाजीपाला विकत आहे त्यांनाही आरोग्याच्या दृष्टिकोनातून मास्क व सैनी टायझर वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन मध्ये मा. अजय भोसले साहेब सांगवी पोलीस स्टेशनं निरिकक्ष यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले यावेळी अश्विन आडसुळे नितिन जाधव रोहन आडसुळे आदी उपस्थित होते.
स्त्री शक्ती जागरण मंच या सामाजिक कार्य बद्दल सर्वांनी सुनीताताई अडसुळे यांचे आभार व्यक्त केले