Tue. May 26th, 2020

सोशल मीडियाच्या माध्यमातून हनुमान जयंती सोहळा संपन्न – ह-भ-प श्री महादेव महाराज भुजबळ

शबनम न्यूज (पिंपरी चिंचवड ) ९ एप्रिल –पिंपरी-चिंचवड शहरातील कोरणा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत चाललेला असल्याने प्रशासनाने अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे आणि शासनाचे आदेश पालन अनेक लोक करत असल्यामुळे “पोलिसांचे आदेश पाळू या आणि पूर्ण रोगाला हरवू या” या नियमाला अनुसरून वाकड येथील ह-भ-प श्री महादेव महाराज भुजबळ हे गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड विजेते महाराज यांनी फेसबुकच्या माध्यमातून हनुमान जयंती सोहळा साजरा केला.

 

 

 

 

 

 

 

बुधवार दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता प्रवचन सेवे ला सुरुवात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या “पिंड घारीने झडपीला अंजनीने तो सेवेला” या अभंगाच्या माध्यमातून हनुमंतराय यांचा जन्म होण्यापूर्वी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी भावार्थरामायण यांच्या माध्यमातून जे वर्णन केले आहे त्याचे सादरीकरण भुजबळ महाराज यांनी केले व बरोबर साडेसहा वाजता हनुमान जन्म सोहळा साजरा केला पूर्व सूचनेप्रमाणे अनेक श्रोत्यांनी आपल्या घरातील हनुमानाची, प्रभुराम किंवा इतर देवतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सदर आनंदसोहळा साजरा केला,

 

 

 

 

 

 

पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली ,कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या ठिकाणी असणाऱ्या अनेक श्रोत्यांनी आपापल्या घरी हनुमान जयंती फेसबुक प्रवचनाच्या माध्यमातून साजरी केली असे ह-भ-प श्री महादेव महाराज भुजबळ यांनी सांगितले आहे.

 

ताज्या बातम्या