Wed. May 27th, 2020

#CORONAVIRUS : प्रभागातील नागरिकांच्या मदतीला नगरसेवक राजू बनसोडे

शबनम न्यूज : पिंपरी-चिंचवड (दि.30 मार्च) – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेवक राजू बनसोडे यांनीही आपल्या प्रभागात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आरोग्याच्या बाबतीत धोका निर्माण होऊ नये याकरिता उपाययोजना केली असून त्यांनी अनेक गरजू नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळावे याचेही योग्यप्रकारे नियोजन केले आहे तसेच प्रभागात ठिकाणी कीटकनाशक औषधाची फवारणी ही केली जात आहे .

 

 

 

 

 

 

 

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रभाग क्र.३० नागरिकांच्या आरोग्यासाठी खबरदारी म्हणुन नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांनी स्वतः प्रभागामध्ये घुलेवाडी लिंबोरे वस्ती,आनंदवन वसाहत,काटे वस्ती व फुगेवाडी या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्याकडून औषध व सॅनिटायझर फवारणी करून घेतली. व नागरिकांना कोरोना बाबत सुरक्षित राहण्याचे अवाहन केले

 

ताज्या बातम्या