Thu. Apr 9th, 2020

दहावीचा निकालही पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता

शबनम न्युज : मुंबई (दि. २६ मार्च ) – कोरोना च्या संकटा मुळे देश भर संचार बंदीलागू आहे या संचारबंदी मुळे दहावीच्या उत्तरपत्रिका शाळेतच अडकून पडले आहे आणि शिक्षकांना उत्तर पत्रिका 15 एप्रिलपर्यंत तपासता येणार नाही महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या लाखो उत्तरपत्रिका सध्या संचारबंदी मुळे तपासणी विना तशाच पडून आहेत. दहावीचा एक पेपर पुढे ढकलण्यात आलेला आहे मात्र आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत त्याच्या उत्तर पत्रिका या त्या त्या परीक्षा केंद्रावर तसेच पडून आहेत संचार बंदी पूर्वी उत्तर पत्रिका तपासण्याचे कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते 15 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू असल्याने एकही उत्तर पत्रिका तपासता येणार नाही त्यामुळे दहावीचा निकालही पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

 

ताज्या बातम्या