Thu. Apr 9th, 2020

coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांची गैरसोय होणार नाही – महापौर उषा उर्फ माई ढोरे

शबनम न्युज : पिंपरी (दि. २६ मार्च ) – पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांची गैरसोय होणार नाही असे आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले आहे ,जगभर “कोरोना” COVID – 19 विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून महापालिकेकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक संवेदनशील व्यक्ती/ संस्थांनी शहरातील गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. अशा सर्व व्यक्तींची अशा परिस्थीतीत वैयक्तीक संपर्क साधणे शक्य होणार नसल्याने अशा सर्व व्यक्ती / संस्थांनी त्यांना जी मदत करावयाची आहे, त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, तूरडाळ, खाद्यतेल, मसाला, कांदे, बटाटे या स्वरूपात मदत करता येईल किंवा ३ किलो तांदूळ, १ किलो तूरडाळ, पावकिलो खाद्यतेल, १०० ग्रॅम मसाला, १ किलो कांदे, १ किलो बटाटे याचे पॅकिंग बनवून बॅडमिंटन हॉल, संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे देण्यात यावे. अधिक माहितीसाठी महानगरपालिका सारथी क्रमांक ८८८८००६६६६ वर संपर्क साधण्यात यावा.

 

 

 

अशा अत्यावश्यक वस्तूंचा फायदा दिव्यांग, निराधार व्यक्ती, जेष्ठ नागरिक, एकटी राहणारी व्यक्ती, दुस-यांवर अवलंबून असणारी व्यक्ती, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना होणार आहे. या उपाय योजने संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त कार्यालयात आज गुरुवार दि. 26 मार्च रोजी आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली.

 

 

 

या बैठकीत स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवी संस्था यांनी करावयाच्या उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, नगरसेवक अभिषेक बारणे उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या