Thu. Apr 9th, 2020

#CORONAVIRUS : लॉक डाऊन च्या आदेशाचे असंघटित बांधकाम कामगारांकडून पालन ; नोंदीत कामगारांच्या खात्यात पैसे जमा करा – इरफान सय्यद

शबनम न्युज : पिंपरी (दि. २६ मार्च ) – देशात 21 दिवस लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील नाका व बांधकाम कामगार 21 दिवस उदरनिर्वाह? कसा करणार हा मोठा प्रश्न आहे. लॉकडाऊन च्या आदेशाचे असंघटित बांधकाम कामगारांनी तंतोतंत पालन केले आहे. त्यामुळे नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात सरसकट पैसे जमा करा अशी मागणी महाराष्ट्र मजूर संघटनांचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे.

 

 

 

 

 

 

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील ,राज्याचे मुख्य सचिव यांना निवेदन दिले आहे.

 

 

 

 

 

कोरोना व्हायरस या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. आपल्या देशातील कोरोनाव्हायरस या आजाराशी लढा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहे. मुख्यत्वे म्हणजे कोरोना व्हायरस या आजारात संसर्ग रोखण्यासाठी देशाची पंतप्रधान नरेंद्र जी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले आहे.

 

 

 

 

 

 

कोरोना आजाराचा संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय व आदेश कौतुकास्पद व देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सर्व देशभरातील नागरिक या आदेशाचे पालन करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजून घरात राहत आहे. महाराष्ट्रातील असंघटित बांधकाम कामगार सुद्धा सरकारी आदेशाचे पालन करीत आहे. या नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात सरसकट पैसे जमा करावेत.

 

 

 

 

 

महाराष्ट्रात असंघटित क्षेत्रातील अनेक कामगार आहेत. ज्याचे हातावरचे पोट आहे .बांधकाम कामगार हा असाच हातावर पोट असणाऱ्या असंघटित कामगार आहे. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. या मंडळांतर्गत नोंदीत जीवित बांधकाम कामगारांची संख्या 13 लाख एवढी आहे.

 

 

 

 

 

 

 

 

कष्ट करून रोजचे रोज हातावर पोट असणाऱ्या या बांधकाम कामगारावर आज उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी शासन आदेशाचे पालन करत त्यांना घरातच राहावे लागत आहे. रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणारे हे कामगार 21 दिवस खाणार काय? काम बंद असल्याने पोटापुरते कमावणाऱ्या या कामगारांची परिस्थिती दोन दिवसातच बिकट झाली आहे.

 

 

 

 

 

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार यांची माहिती आहे. तसेच मंडळाकडे निधी जमा आहे. संकटाच्या या कठीण काळात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळाने या आपल्या नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

 

 

 

 

 

महाराष्ट्र मजदूर संघटना पुणे जिल्ह्यातील 25 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहे . सर्व नोंदीत बांधकाम कामगारांचे खात्यात सरसकट रक्कम १०,००० डीबीटी मार्फत जमा करावे. जेणेकरून या 21 दिवसाच्या लॉकडाऊनच्या संकटमय काळात ते आपला उदरनिर्वाह करू शकतील. असे इरफान सय्यद यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र मजदूर संघटना व तसेच सर्व कामगार यांनी स्वागत करून केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाचे पालन केले आहे.

 

ताज्या बातम्या