Mon. Mar 30th, 2020

CORONAVIRUS : वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही संसर्ग पसरत असल्याचा गैरसमज – डॉ. तात्याराव लहाने

शबनम न्यूज : मुंबई (दि. २५ मार्च ) – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरत असून त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही संसर्ग पसरत असल्याचा संशय व्यक्त होत असताना, हा केवळ गैरसमज असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तसेच, अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

 

 

 

 

 

संसर्ग होत असल्याच्या भीतीमुळे अनेक मोठ्या सोसायट्यांनी वृत्तपत्रे बंद केली आहेत. काही शहरांमध्ये वृत्तपत्र विक्रेता संघांनीही वितरण बंद केल्याने या गैरसमजाला बळ मिळाले आहे. मात्र, वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) उपसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

ताज्या बातम्या