Mon. Mar 30th, 2020

CORONAVIRUS : इस्लामपुरातील चौघा कोरोनाबाधित भाविकांच्या कुटुंबातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण

शबनम न्यूज : सांगली (दि. २५ मार्च ) – हज यात्रेहून आलेल्या इस्लामपुरातील चौघा कोरोनाबाधित भाविकांच्या कुटुंबातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट झाले. त्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अशा रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे.

 

 

 

 

 

 

इस्लामपूर शहरातील एका कुटुंबातील चौघे सौदी अरेबिया येथे हज यात्रेला गेले होते. तेथून ते १३ मार्च रोजी परतले होते. त्यांना १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ करण्यास सांगितले होते. या कुटुंबात ३५ सदस्य असून, हज यात्रेहून परतलेल्यांचा घरातील सर्वांशीच संपर्क आला होता. त्यामुळे दि. १९ रोजी सर्वांची तपासणी करून त्यातील १८ जणांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यातील चौघांचा अहवाल सोमवारी आला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वैद्यकीय पथकाने हालचाली करून या कुटुंबाच्या घराचा परिसर निर्जंतुक केला. बॅरिकेटस लावून तो बंदिस्त केला.

 

 

 

 

ताज्या बातम्या