Mon. Mar 30th, 2020

CORONAVIRUS : शहरासह जिल्ह्यात हि पेट्रोल-डिझेल विक्री बंद

शबनम न्यूज : पुणे (दि. २४ मार्च ) –  करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आटोकाट प्रयत्न सुरू असताना रस्त्यावरील रहदारी सुरूच असल्याचं चित्र आहे. अनेक जण रस्त्यावर गाड्या घेऊन फिरत असल्याचं त्याचबरोबर पेट्रोल पंपवर गर्दी होत असल्याचं दिसून आल्यानं पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

 

 

 

 

 

करोनाचा संसर्ग थांबवण्याच्या दृष्टीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल पंपावर होत असलेल्या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश मंगळवारी सायंकाळी जारी करण्यात आले आहे.

 

ताज्या बातम्या