Thu. Jul 9th, 2020

CoronaVirus : राहुल गांधींचा इशारा खरा ठरला; मोदी सरकारला आधीच केलं होतं सावध

राहुल गांधी यांनी इतर देशात करोनाचा संसर्ग होत असतानाच  ट्विट करून सरकारला केलं होतं सावध

शबनम न्यूज ( दिल्ली ) २३ मार्च – करोनामुळे भारतातील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रापाठोपाठ इतर राज्यातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सरकारकडून करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाय केले जात असले, तरी संसर्ग रोखण्यात अपयश येत असल्याचे एकूण चित्र आहे. यासंर्दभात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फेब्रवारीमध्येच केंद्र सरकरला सावध केलं होतं. पण, सरकारनं त्यांचा सल्ला गांर्भीयानं न घेतल्याचं दिसलं. सध्या भारतात करोनानं हातपाय पसरले आहेत.

करोनानं जगातील देशांपाठोपाठ भारतातही शिरकाव केला आहे. देशातील करोना बाधितांची दररोज वाढत असून, देशातील तब्बल ७५ जिल्हे लॉकडाउन करण्यात आले आहेत. केरळ, महाराष्ट्र, पंजाबबरोबरच देशातील इतर राज्यांमध्येही करोनानं पाय ठेवले असून, करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत चालला आहे.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!