Tue. May 26th, 2020

PIMPRI : मनपा कर्मचारी , अधिकारी यांनी आपल्या हि आरोग्याची काळजी घ्यावी – संतोष लोंढे

शबनम न्यूज (पिंपरी चिंचवड ) २३ मार्च – कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात अधिकारी-कर्मचारी जोखीम पत्करून कामकाज करीत आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील विविध विभागात, तसेच प्रभागातील स्लम भागात, वायसीएम रुग्णालय आणि इतर विभागात उपस्थित असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क चे वाटप केले स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही यावेळी सभापती संतोष लोंढे यांनी कर्मचाऱ्यांना दिला कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी-कर्मचारी करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 

 

ताज्या बातम्या