Mon. Mar 30th, 2020

काँग्रेसकडून राज्यसभेच उमेदवार जाहीर

शबनम न्यूज : नवी दिल्ली (दि.१२ मार्च ) :-  काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्रातील जागेवरुन राज्यसभेवर कोण जाणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राजीव सातव यांच्या उमेदवारीविषयी काँग्रेसकडून अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

 

 

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या.

 

राजीव सातव यांनी 2019 ची लोकसभा निवडणुक न लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ते राज्यसभेच्या तिकीटाद्वारा पुन्हा संसदेत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहे. दरम्यान 2014 साली राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा पराभव करत खासदारपद मिळवलं होतं. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला आहे.

 

 

 

ताज्या बातम्या