WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?
Thu. Feb 20th, 2020

नाइटलाइफमुळे रात्री काम करणाऱ्यांची गैरसोय दूर होईल,रोजगाराचे प्रमाण वाढेल-महापौर किशोरी पेडणेकर

शबनम न्यूज: मुंबई (दि.२१ जानेवारी) :-  असे म्हणतात की, मुंबई शहर कधी झोपत नाही. जागतिक दर्जाचे हे शहर घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सतत धावत असते. अशा या शहरातील सर्व व्यवहार २४ तास सुरू ठेवण्याची संकल्पना पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आणली आहे. त्यानुसार, पुढच्या आठवड्यापासून मुंबईतील काही अनिवासी भागांमध्ये नाइटलाइफला सुरुवात होणार आहे. येथील हॉटेल, मॉल्स, दुकाने असे व्यवहार दररोज दिवस-रात्र सुरू राहणार आहेत. मात्र, या प्रयोगाला भाजपने तीव्र विरोध केला आहे, तर पोलीस यंत्रणेवर ताण येईल, असे मत गृहमंत्र्यांनीच व्यक्त केले आहे. मुंबई नाइटलाइफसाठी तयार आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

नाइटलाइफसाठी शहर तयार आहे का?
त्यात तयार होण्यासारखे काय आहे? असेही मुंबईत रात्री दोन वाजेपर्यंत व्यवहार सुरूच असतात. रात्री रेल्वे २-३ तास बंद असते, तेवढ्यापुरती मुंबई थांबते. पहाटे चारपासून पुन्हा दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते यांची धावपळ सुरू होते. गेल्या काही वर्षांत कॉर्पोरेट हाउसेस वाढल्यामुळे अनेक भागांमध्ये १४-१८ तास कार्यालये सुरू असतात. याउलट नाइटलाइफमुळे रात्री काम करणाऱ्यांची गैरसोय दूर होईल. रोजगाराचे प्रमाण वाढेल,दिवसा शिक्षण घेणा-या गरजवंतांना रात्री हॉटेल, मॉल्समध्ये काम करता येईल. मुख्य म्हणजे बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. प्रत्येक हाताला काम मिळेल. असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाले .

 

ताज्या बातम्या