WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?
Thu. Feb 20th, 2020

बहुप्रतिक्षित व बहुचर्चित अमिताभ बच्चन यांचा झुंड चित्रपटाचा टिझर उद्या होणार रिलीज

शबनम न्युज : फिल्मी दुनिया (दि.२० जानेवारी २०२०) – नागराज मंजुळे व अमिताभ बच्चन या दोघांचा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. ज्या दिवसापासून झुंड चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. त्या दिवसापासून चित्रपटाविषयी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

सैराट चित्रपट नागराज मंजुळे यांना जगभरात प्रसिद्ध मिळवून दिली. असा हरहुन्नरी निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे स्वप्न होते की, अमिताभ बच्चन सोबत काम करावे त्यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करावे आणि ही संधी त्यांना मिळाली असून आता त्यांच्या दिग्दर्शनात बॉलीवूडचे बिग बी यांच्या हे या चित्रपटातून मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टिझर उद्या प्रकाशित होणार आहे या चित्रपटाचा फर्स्ट रिलीज लुक झाला असून लवकरच आपण या चित्रपटाचा टीझर पाहणार आहोत.

 

ताज्या बातम्या