विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरची इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या
शबनम न्यूज : नाशिक (दि. १५ जानेवारी २०२०) – विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकमधील सिन्नर येथील एका महिलेने डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे तणावत असलेल्या डॉक्टरने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव गोविंद गोरे असे आहे. ते सिन्नरमध्ये स्नेहल रुग्णालय चालवायचे. एक महिला रुग्ण त्यांच्याकडे पित्तावर उपचार घेण्यासाठी आली होती. मागील बऱ्याच काळापासून या महिलेवर उपचार सुरु होते. एकदा चेकअपदरम्यान गोरे यांनी या महिला रुग्णाला ‘तू मला खूप आवडते,’ असं सांगितलं.
या प्रकारामुळे संतापलेल्या महिलेने थेट सिन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टर गोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर डॉक्टर गोरे प्रचंड तणाव आला. यामधूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांमध्ये त्यांनी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. गोरे यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखळ झाले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. गोरे यांनी अशाप्रकारे अगदी टोकाचा निर्णय घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांना मानसिक धक्का बसला आहे.
प्रतिनिधी शबनम न्यूज
दिलीप सोनकांबळे