Mon. Oct 26th, 2020

ठाकरे सरकारनं : फडणवीस सरकारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक लावला

 योजनेसाठी निधी दिल्यास आर्थिक गैरव्यवहार म्हणून कारवाई करण्यात येईल

शबनम न्यूज : मुंबई (दि.०७ जानेवारी २०२०) :- फडणवीस सरकारचे अनेक निर्णय रद्द करणाऱ्या ठाकरे सरकारनं आता गेल्या सरकारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक लावला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं या योजनेला मिळणारा निधी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनी याबद्दलचं पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील जलयुक्त शिवारची कामं थांबणार आहेत.

जलयुक्त शिवार देवेंद्र फडणवीसांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेतून अनेक जिल्ह्यांना फायदा झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. मात्र नव्या सरकारनं ही योजना गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी न देण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नाशिक, जळगाव, नंदुरबार, नगर, धुळे या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांना ब्रेक लागणार आहे. विभागीय आयुक्तांचे आदेश डावलून जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी दिल्यास आर्थिक गैरव्यवहार म्हणून कारवाई करण्यात येईल, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यातील जनतेशीदेखील शत्रूप्रमाणे वागू लागले

ठाकरे सरकारच्या या निर्णयाबद्दल भाजपानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाला शत्रू मानणारं सरकार सध्या सत्तेत आहे. मात्र भाजपाला शत्रू मानणारे आता राज्यातील जनतेशीदेखील शत्रूप्रमाणे वागू लागले आहेत. मागील सरकारच्या चांगल्या योजना थांबवल्या जात आहेत. प्रत्येक पावलावर सरकार हेच करत आहे. सरकारची ही भूमिका दुर्दैवी आहे, अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

 

अकरावीची प्रवेश प्रक्रिया तातडीने चालू करा –  अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

#PUNE : लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन

#PIMPRI : नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध योजनांचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

#PIMPRI : आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत आपणही करा ; राहुल कलाटे यांचे फलकाद्वारे नागरिकांना आवाहन

ताज्या बातम्या

अकरावीची प्रवेश प्रक्रिया तातडीने चालू करा –  अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

#PUNE : लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन

#PIMPRI : नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध योजनांचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

#PIMPRI : आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत आपणही करा ; राहुल कलाटे यांचे फलकाद्वारे नागरिकांना आवाहन

error: Content is protected !!