Thu. Jul 9th, 2020

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली निवेदनद्वारे मागणी

शबनम न्यूज : पुणे (दि. १९) – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत विविध प्रकारच्या समस्या मार्गी लावणेबाबत डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडियाचे सेक्रेटरी डॉ अजय कुमार याना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी निवेदन दिले . यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष नवनीत कुमार , मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार आदी मान्यवर उपस्थित होते .

गोळीबार मैदानाजवळील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडियाचे सेक्रेटरी डॉ अजय कुमार यांनी भेट दिली असता त्यावेळेस हे निवेदन देण्यात आले . यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मंजूर शेख , संजय कवडे , मुन्ना केदारी , वाल्मिक जगताप , अजीम गुडाकूवाला , हाजी फारुख मुजफर , मुजफ्फर आत्तार , हाजी बशीर शेख व धनंजय उरुड  आदी मान्यवर उपस्थित होते .

या निवेदनावर केंद्र शासन कडून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला जी एस टीचा निधी लवकरात लवकर मिळावा , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची १३० कोटी रुपयाची एफ डी मोडून अनावश्यक खर्च करून त्यामध्ये भ्रष्ट्राचार करण्यात आला त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी , सन २०१७ साली गरज नसताना द्विशताब्दी वर्षानिमित्त केलेल्या कार्यक्रम व स्वागत कमानीचा व इतर नाहक खर्चाची चौकशी करण्यात यावी , बोर्डाचे उत्पन्न वाढविण्याच्या निमित्ताने बोर्ड हद्दीतील रेसिडेन्सी (निवासी) प्रॉपर्टी टॅक्स खूप वाढविण्यात आला तो नियमित प्रमाणे कमी करण्यात यावा वाहन प्रवेश कर कमी करण्यात यावा , घोरपडी बाजारमधील अलेक्झांडर रोडवरील  न ७  या ठिकाणी जागा मालकाला लाच मागणाऱ्यांना लेडी बोर्ड मेंबर चौकशी करण्यात यावी व तिला निलंबित करण्यात यावे ,  पुणे कॅन्टोन्मेंट प्रॉपर्टी हस्तांतरण संदर्भात तसेच , नवीन बांधकामाचे प्लॅन पस संदर्भात बोर्डाच्या इतर सर्व कामासाठी नागरिकांची सदन नुसार त्वरित कामे करण्याचे आदेश देण्यात यावे , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे रहिवाशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे . त्यासाठी stp प्लॅनची ५ tmcl ची आवश्यकता असताना २० tmcl साठी मोठया इमारतीचे बांधकाम करून भ्रष्ट्राचार करण्यात आला . श्री छत्रपती शिवाजी मार्केट २०० वर्ष जुने असून त्यावेळेपासून बोर्डाच्या नागरिकांना ताजे चिकन मिळते . परंतु सध्याच्या बोर्डाने चिकन ड्रेसिंग कोंढव्याला हलविण्याचे ठरविले आहे . छत्रपती शिवाजी मार्केटपासून येण्या जाण्यास १४ किलोमीटर लांब जावे लागते . नागरिकांना ताजे चिकन त्यामुळे भेटणार नाही . नागरिकांच्या ताजे चिकन खाण्यावर बोर्ड बंदी आणत आहे त्यामुळे मार्केट मधील अधिकृत चिकन स्टॉल धारकांचा व्यापार बंद पडेल नागरिकांनाही गैरसोय होईल . त्यासाठी चिकन ड्रेसिंग कोंढव्याला न हलविता त्यातून पर्यायी मार्ग काढून चिकन ड्रेसिंग छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये ठेवण्यात यावे .

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्व रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना खाद्यातून प्रवास करावा लागत आहे यामुळे अपघात होत आहेत , तरी सदरचे रस्ते त्वरित करण्यात यावेत .

ज्या नागरी समस्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आहेत , त्या आपल्या खात्यामार्फत वैयक्तिक लक्ष देउन सोडविण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात केली आहे .

सोबत – डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडियाचे सेक्रेटरी डॉ अजय कुमार याना देण्यात आलेले निवेदन जोडले आहे .

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!