WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

आकुर्डी रोटरी क्लबतर्फे ग्रामीण भागातील शाळांना 100 हात धुण्याचे हँड वॉश स्टेशन

खासदार श्रीरंग बारणे, रोटरी क्लबचे आरआय शेखर मेहता यांच्या हस्ते करणार सुपूर्द

पिंपरी, 8 नोव्हेंबर – आकुर्डी रोटरी क्लबतर्फे ग्रामीण भागातील शाळांना 100 हात धुण्याचे हँड वॉश स्टेशन देणार येणार आहेत.  पुणे जिल्ह्यातील ग्रामीण, सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या शाळांना हँड वॉश स्टेशन देण्यात येणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे आणि रोटरी क्लबचे आरआय शेखर मेहता यांच्या हस्ते रविवारी (दि.10) सुपूर्द केले जाणार आहेत. याबाबतची माहिती आकुर्डी रोटरी क्लबचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल यांनी दिली.

रावेत येथील मधुरा लॉन्स येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 100 शाळांना हँड वॉश स्टेशन देणार येणार आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आरआयचे (2021-22)    अध्यक्ष शेखर मेहता,  टीआरएफ WINS समितीचे सदस्य रमेश अग्रवाल, जिल्हा प्रांतपाल रवी धोत्रे, महेश कोटबागी, प्रकल्प अधिकारी रवी नामदे, सचिव शशिकांत शर्मा, सचिन पारखे, संतोष आगरवाल आदी उपस्थित असणार आहेत.

अध्यक्ष जिग्नेश आगरवाल म्हणाले, ” विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नळाद्वारे पिण्यासाठी आणि हात धुण्यासाठी देखील पाणी मिळत नाही.  त्यामुळे जिल्ह्यातील गरजू, वंचित आणि ग्रामीण शाळांना 100 हँड वॉश स्टेशन उपलब्ध करुन दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळेल.

प्रकल्प अधिकारी रवी नामदे म्हणाले, ”शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी खेळतात. हात धुण्याची व्यवस्था नसल्याने हात धुतले जात नाहीत. जंतू हातावरच राहतात. हे जंतू शरीरात जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आजार होतो. विद्यार्थी आजारी पडतात. त्याकरिता रोटरी क्लबतर्फे  हँड वॉश स्टेशन दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी हात स्वच्छ थुतल्यास त्यांना आजार होणार नाही. आकुर्डी रोटरी क्लबचा हा सर्वांत चांगला प्रकल्प आहे”

 

ताज्या बातम्या