Tue. May 26th, 2020

शबनम न्यूज : पुणे (दि. ०५) – त्रिपुरारी पौर्णिमेच्यानिमित्ताने सकल मराठा समाज पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्यावतीने पुणे कॅम्प भागातील सिल्वर ज्युबली पेट्रोलपंपाजवळील डॉ कोयाजी रोडवरील मराठा वॉर मेमोरियल येथे मंगळवार दिनांक – १२ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता ” दीपोत्सव ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

या कार्यक्रमामध्ये सन १९७१ च्या युध्दात सहभागी झालेले सेवानिवृत्त कर्नल प्रतापराव चव्हाण , मराठा समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रअण्णा कोंढरे , पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीचे अध्यक्ष बापूसाहेब गानला , पुणे कॅम्प  भागात गेली ५० वर्षांपासून  पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढी चालविणारे ऍड. अर्जुन खुर्पे आदींचा सन्मान करण्यात येणार आहे .

या कार्यक्रमात सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी , सेवानिवृत्त अधिकारी , पुणे कॅन्टोन्मेंट भागातील सामाजिक संस्था व सार्वजनिक मंडळे व सेवाभावी नागरिकानी  संयोजन करण्यात आले आहे .

सर्व नागरिकांनी शहीद वीरांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे . या कार्यक्रमाचे समन्वयक सकल मराठा समाज पुणे कॅन्टोन्मेंट विभागाने केले आहे .

 

ताज्या बातम्या