Tue. May 26th, 2020

उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एनिमेटेड ई -लर्निंग सॉफ्टवेअर

शबनम न्यूज : पुणे (दि. ०५) – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै आयसीटी ऍकेडमी’ ने पहिली ते दहावी उर्दू  माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एनिमेटेड ई -लर्निंग सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरचे उदघाटन महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एम ए गफार,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष इलाहाजुद्दीन फारुकी ,आदिल प्रकाशनचे संचालक कामिल शेख यांच्या हस्ते झाले.
हे सॉफ्टवेअर हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट चे विश्वस्त तन्वीर इनामदार यांनी तयार केले आहे. देशातील अशा स्वरूपाचे हे पहिले सॉफ्टवेअर आहे. डेस्कटॉप-लॅपटॉप  संगणक ,मोबाईल आणि टॅब  हे  सॉफ्टवेअर चालते आणि अभ्यासक्रमाप्रमाणे दरवर्षी सुधारित आवृत्ती वापरता येते ,अशी माहिती तन्वीर इनामदार यांनी दिली .
‘शिक्षण हेच प्रगतीचे महाद्वार असून अत्याधुनिक संगणकीय शिक्षण प्रणाली गरीब वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल . मागे पडलेल्या वर्गाची प्रगती हेच विकसित तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट असायला हवे ‘असे उदगार डॉ पी ए इनामदार यांनी काढले .मुमताज सय्यद यांनी प्रास्ताविक केले.यावेळी १०० शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते .आझम कॅम्पस येथे हा कार्यक्रम २ नोव्हेंबर रोजी झाला.
 

ताज्या बातम्या