WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी नचिकेत बालग्राम अनाथ आश्रमात

शबनम न्यूज : पिंपरी (दि. ०४) – पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्चच्या आर्ट सर्कल विभागातील विद्यार्थ्यांनी यावर्षी दिवाळी ‘नचिकेत बालग्राम’ या अनाथ आश्रमात साजरी केली. आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त फराळ, स्वत: रंगविलेल्या पणत्या, आकाश कंदिल नचिकेत बालग्राममधील विद्यार्थ्यांना भेट दिल्या. तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूदेखील देण्यात आल्या.
यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. एच.यू. तिवारी, आर्ट सर्कलच्या समन्वयक प्राध्यापिका प्रिया ओघे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनात वैष्णवी पाटील, चिन्मय जगताप, रोहित दिवेकर, आयुष केदारी, तमन्ना विश्नोई, नेहूल गुप्ता, ज्ञानदा, जुई पाणगरे, झैद रिजवान पिंजारी, स्वराज पवार आदींनी सहभाग घेतला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस. डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

ताज्या बातम्या