Wed. May 27th, 2020

दोन्ही समाजबांधवानी एकत्रित येऊन दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश

शबनम न्यूज : पुणे (दि. ०४) – श्री. गुरुनानक देवजी यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्ताने पुणे लष्कर भागातील रेसकोर्सजवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे मुस्लिम बांधवांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला . यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ इक्राम खान काटेवाला ,  गुरुद्वारा गुरुनानक दरबारमध्ये मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष निसार सागर , सचिव रिजवान शेख , संस्थापक मसूद शकील राय , मुस्लिम साहित्याचे अभ्यासक  अनिस चिश्ती , करीमउद्दीन शेख , ग्यानी अमरजितसिंग , हरमीदरसिंग घई  , मोहिंदरसिंग कंधारी , मनजितसिंग विरदी ,  विक्की ऑबेरॉय ,  करमजीतसिंग आनंद , नरेंद्रपाल सिंग , कुलजीतसिंग चौधरी व शीख व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष  चरणजितसिंग सहानी व संतसिंग मोखा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला . आपल्यामधील  बंधूभाव व प्रेम सर्वधर्म समभाव पध्दतीने एकत्र आणून मानवतेचा संदेश देण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत , या एकत्र येण्याचा आम्हांला खूप आनंद झाला आहे . मोहम्मद पैगंबर जयंतीला आम्ही शीख बांधवाना आमंत्रित करणार आहोत . यामुळे एकमेकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल . असे मुस्लिम साहित्याचे अभ्यासक  अनिस चिश्ती यांनी सांगितले .

यावेळी मुस्लिम बांधवाना शीख बांधवानी गुरुग्रंथसाहेबचे हिंदी भाषांतर असलेली पुस्तके भेट दिली . तसेच , शीख बांधवाना मुस्लिम बांधवानी पंजाबी भाषेत भाषांतर असलेली कुराण शरीफच्या प्रत भेट देण्यात आली .  त्यानंतर मुस्लिम बांधवानी लंगरचा लाभ घेतला .

 

ताज्या बातम्या