Sun. Jul 12th, 2020

महापौर-उपमहापौर यांची निवड होणार 20 नोव्हेंबरला ?

शबनम न्यूज : पिंपरी (दि. ३१) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव. आणि उपमहापौर सचिन चिंचवडे. यांची मुदत 21 नोव्हेंबरला संपत आहे त्यामुळे नव्या महापौर व उपमहापौर पदाची निवड 20.नोव्हेंबर च्या सर्वसाधारण सभेत होणार आहे या दिवशी सत्ताधारी भाजप चा तिसरा महापौर विराजमान होणार असून नवीन महापौर कोण याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे

फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे कारभारी आले भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान चरोली चे नगरसेवक नितीन काळजे,यांना मिळाला ते 14 मार्च 2017 ला महापौरपदी निवडले गेले त्यांचा दीड वर्षाचा कालावधी संपल्यानंतर चार ऑगस्ट 2018 ला चिखलीचे नगरसेवक राहुल जाधव,हे महापौरपदी विराजमान झाले आता यानंतर विधानसभा निवडणुक कार्यकाळ असल्याने विद्यमान महापौर व उपमहापौर यांची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने 22 ऑगस्टला घेतला होता अध्यादेश जाहीर झाल्यापासून पुढील तीन महिने सदर निवडणूक घेण्याचे स्पष्ट करण्यात आले होते

निर्धारित कालावधीनुसार महापौर राहुल जाधव व उपमहापौर सचिन चिंचवडे यांचा कालावधी 21 सप्टेंबरला संपत होता मात्र सदर अध्यादेशामुळे त्यांना वाडी मुदत मिळाली

आदेश जाहीर झाल्यापासून तीन महिने म्हणजे 21 नोव्हेंबरपर्यंत ही मुदत आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाने महापौर व उपमहापौर निवडीबाबत हालचाली सुरू केले असून महापौर व उपमहापौर कोणत्या वर्गासाठी आरक्षित करायचे याचा ड्रॉ 10 नोव्हेंबरपर्यंत नगरविकास विभागाकडून काढला जाणार आहे त्यानुसार पिंपरी-चिंचवड सह राज्यातील काही महापौर व उपमहापौरपदासाठी नगरसेवकांसाठी प्रवर्गासाठी आरक्षित होईल

महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या नगरसचिव विभागात किमान दहा दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे नोव्हेंबरच्या वीस तारखेच्या पालिका सभेत नवे महापौर व उपमहापौर ची निवड होईल त्यापूर्वी तीन दिवस इच्छुकांकडून अर्ज मागविले जातील सत्ताधारी भाजपकडून आलेले अर्जावरून महापौर व उपमहापौर पदाचे नाव निश्चित होईल महापौरपद कोणत्या वर्गासाठी राखीव होते
यावरून पुढील महापौर ठरणार आहे यात महापौरपद आमदार महेश लांडगे,आमदार लक्ष्मण जगताप,या यापैकी कोणाच्या गटाकडे महापौरपद जाते यावरून नवा महापौर पिंपरी-चिंचवड शहराला मिळणार आहे दरम्यान विद्यमान महापौर व उपमहापौर यांना मुदतवाढ मिळाल्याने नवे महापौर व उपमहापौर यांना दोन महिन्यांचा कालावधी कमीच मिळणार आहे

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!