Sun. Jul 12th, 2020

सत्यजित देशमुख यांची भाजपमध्ये जाण्याची शक्यता

SHABNAM NEWS : SANGLI (DATE. 15) – सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या रुपात अजून एक मोठा नेता भाजपाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. सत्यजित देशमुख यांच्या भाजपाप्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून ते सोमवारी महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपामध्ये प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे.

सत्यजित देशमुख यांनी आगामी वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी आज शिराळा येथे कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा आयोजित केल्याची माहिती आहे. त्यानंतर, सोमवारी ते महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपामध्ये प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. तेव्हापासून सत्यजित यांनी भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सत्यजित देशमुख यांच्याशी बोलणी सुरू असून त्यांना भाजपकडून शिराळा विधानसभा मतदारसंघातून लढवले जाऊ शकते.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!