Tue. May 26th, 2020

माजी कायदामंत्री आणि जेष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

SHABNAM NEWS : NEW DILHI (DATE. 08) – माजी कायदामंत्री आणि जेष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते त्यांच्यामागे मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार आहे.
देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती मागील दोन आठवड्यापासून ते आजारी होते नवी दिल्ली येथील त्यांनी निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधीज्ज्ञ आणि कायद्याचे अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त आहे.
राम जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्टात सह अन्य कोर्टात वकिली केली सहाव्या आणि सातव्या लोकसभेत मुंबईतून भारतीय जनता पक्षाकडून राम जेठमलानी संसदेत निवडून गेले होते व वकिलीबरोबर जेठमलानी यांनी केंद्रातही मंत्री म्हणून काम पाहिले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये जेठमलानी यांनी कायदामंत्री आणि नगर विकास मंत्री म्हणून काम केले होते तर जेठमलानी यांनी 2014मध्ये लखनऊ लोकसभा मतदारसंघातून वाजपेयी यांच्या विरुद्ध निवडणूक लढविली होती.
 

ताज्या बातम्या