Wed. May 27th, 2020

दोन मिनिट बाकी असताना विक्रम लँडर शी तुटला संपर्क

SHBNAM NEWS : RASHTRIY (DATE. 07) – भारताच्या चांद्रयान मोहीमेच्या अखेरच्या टप्प्यात चंद्रावर उतरण्यास दोन मिनिट बाकी असताना विक्रम लँडर शी संपर्क तुटला. अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष डॉ.के. सीवन यांनी दिली.या मोहिमेकडे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह देशाच्या प्रत्येक नागरिकाचे लक्ष लागून राहिले होते. देशातील जनता हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाली होती विक्रम लेंडर शी संपर्क तुटल्यानंतर या विषयांवर काम करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचा पडलेला चेहरा पाहून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना धीर दिला या वैज्ञानिकांची पाठ थोपटत हिम्मत ठेवा निराश होऊ नका तुमचा देशाला अभिमान आहे असे ते म्हणाले.
रात्री एक वाजून 45 मिनिटांनी विक्रम लंडन ने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली विक्रमचे चंद्रावतरन पाहण्यासाठी अवघा देश जागा होता चंद्राच्या पृष्ठभागापासून यांनाच अंतर जसजसे कमी होत होतं तसं सर्वांचे धाकधूक वाढली होती संपूर्ण देशवासीयांच्या उत्साह शिगेला गेला होता इस्त्रो सेंटरमधील शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या मार्गक्रमण आवर बारकाईने लक्ष ठेवून होते. एक वाजून ५३ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते, मात्र चांद्रयान अवघे 2.1 कि.मी.वर असताना विक्रम लँडरची असलेला संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांनबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.

 

ताज्या बातम्या